ऑनलाईन टीम / मुंबई :
आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 546.29 अंकांनी वधारून 50,843.18 वर कार्यरत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 160.25 अंकांनी म्हणजेच 0.96 टक्क्यांनी वधारून 15,079.35 अंकांवर स्थिरावला.
सकाळी शेअर बाजार खुला होताच 1154 शेअर्स तेजीत होते. 248 शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली तर 48 शेअर्समध्ये कोणताही चढ उतार नव्हता.