निफ्टी 82 अंकांनी वधारला : पॉवरग्रिडचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी भारतीय भांडवली बाजार मजबूत होत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये आयसीआयसीआय बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि टेक महिंद्रा यांचे समभाग तेजीत राहिल्यामुळे बाजाराने मजबुतीसह बंद होण्यात यश मिळवले आहे.
दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 318.05 अंकांनी वधारून निर्देशांकाने उच्चांकी 54,843.98 चा टप्पा पार केला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82.15 अंकांनी वधारुन निर्देशांक 16,364.40 ची विक्रमी उंची गाठत बंद झाला आहे.
बाजारात गुरूवारी सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 6 टक्क्यांची वाढ पॉवरग्रिडने प्राप्त केली आहे. यासोबतच टेक महेंद्रा, एचसीएल टेक, टायटन, लार्सन ऍण्ड टुब्रो, एनटीपीसी आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागात प्रामुख्याने तेजी राहिली होती. अन्य कंपन्यांपैकी डॉ.रेड्डीज लॅब, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि ऍक्सिस बँकेसह अन्य समभाग नुकसानीत राहिले होते.
कोरोनाच्या दुसऱया लाटेतून काहीसा दिलासा मिळत असून सध्या आयटी व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये तेजी परतली आहे. यामुळे बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांनी नवी झेप घेतली आहे. मागील एक दोन दिवसांपासून लहान व मध्यम कंपन्यांमध्ये विक्रीचे वातावरण राहिल्याने या दोन्ही क्षेत्रात सकारात्मक वातावरण राहिल्याचे दिसून आले असल्याचे शेअर बाजारातील तज्ञांनी सांगितले आहे.
जागतिक बाजारात आशियातील शांघाय, हाँगकाँग, टोकियो आणि सोल हे नुकसानीत राहिले आहेत. युरोपातील प्रमुख बाजारात सकारात्मक वातावरणाचा कल राहिल्याचे दिसून आले आहे.
आयटीवर नजर …
आयटी क्षेत्रातील समभागावर गुंतवणूकदारांनी नजर ठेवली असून या कारणास्तव बाजाराने मोठी झेप घेतली असल्याचे दिसून आले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- पॉवरग्रिड कॉर्प 187
- टेक महिंद्रा… 1387
- एचसीएल टेक 1097
- टायटन…….. 1836
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1622
- एनटीपीसी….. 119
- आयसीआयसीआय 701
- बजाज ऑटो.. 3766
- इन्फोसिस…. 1690
- टाटा स्टील… 1435
- बजाज फिनसर्व्ह 14289
- बजाज फायनान्स 6198
- एचडीएफसी बँक 1501
- कोटक महिंद्रा 1787
- भारती एअरटेल 623
- एचडीएफसी. 2668
- टीसीएस…… 3353
- एशियन पेन्ट्स 2980
- हिंदुस्थान युनि 2393
- आयटीसी……. 208
- अल्ट्राटेक सिमेंट 7458
समभाग घसरलेल्या कंपन्या
- डॉ.रेड्डीज लॅब 4712
- इंडसइंड बँक. 1035
- ऍक्सिस बँक…. 757
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 776
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2110
- स्टेट बँक……… 427
- मारुती सुझुकी 7010
- नेस्ले………. 18146
- सन फार्मा…… 778
- ल्यूपिन………. 975
- आयशर मोर्ट्स 2615
- अरोबिंदो फार्मा 825
- ग्लेनमार्क…….. 570
- कोलगेट……. 1641
- हॅवेल्स इंडिया 1230
- सिप्ला……….. 905
- पिरामल एन्टर 2717
- वेदान्ता………. 323
- मॅरिको……….. 516
- हिरोमोटो….. 2785
- डिव्हीस लॅब 4914