वेंगुर्ले /वार्ताहर-
राज्यपरीवाहन महामंडळात गेली 36 वर्षे प्रवाश्यांना सेवा देणारे वाहक ते वहातुक नियंत्रक पदावर काम करून सेवानिवृत्त झालेले चंद्रकात दत्ताराम पालकर यांनी एस. टी. प्रवासी सेवेसाठी केलेल्या उत्कृष्ठ कामाबद्दल लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी शाखा वेंगुर्ले तर्फे शाखाधिकारी पुरूषोत्तम राऊळ यांच्या हस्ते चंद्रकांत पालकर दांम्पत्याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छाने सत्कार करण्यांत आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांत जेष्ठ नागरीक अब्दुल रहेमान शेख, सुरेश बटा, सौ. स्मिता पालकर, प्रदीप सावंत, भरत सातोस्कर, लोकमान्य पतसंस्थेतील कर्मचारी चक्रपाणी गवंडी, प्रिया करंगुटकर, स्नेहल गांवकर, सोनू कांबळी आदींचा समावेश होता.