प्रतिनिधी / बेळगाव
बाजार गल्ली, वडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक आणि सेवानिवृत्त शिक्षक आनंद विश्वनाथ साठे (वय 80) यांचे दि. 8 रोजी वृद्धापकालीन आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतण्यांचा परिवार आहे.
आ. वि. साठे या नावाने परिचित असणारे साठे यांनी येथील बी. के. मॉडेल शाळेमध्ये भाषा विषयाचे शिक्षक म्हणून प्रदीर्घकाळ सेवा बजावली. आपल्या सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी आणि समाजशास्त्र या विषयांचे अध्यापन केले. तिन्ही विषयांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ‘तरुण भारत’मध्ये भाषांतरकार म्हणून सेवा बजावली. बुधवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी शैक्षणिक क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.