प्रसारमाध्यमांना पाहताच ओळख लपविण्याचा प्रयत्न
बॉलिवूडमध्ये आता एका तरुण जोडप्याच्या अफेयरची चर्चा होऊ लागली ओ. सैफ अली खानचा पुत्र इब्राहिम आणि टीव्ही अभिनेभी श्वेता तिवारीची मुलगी पलक यांचे रिलेशनशिप सध्या चर्चेत आहे. या दोघांनाही शुक्रवारी रात्री एकत्र पाहिले गेले आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधींना पाहताच पलकने स्वतःचा चेहरा लपविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. इब्राहिम आणि पलक यांच्या रेस्टॉरंटबाहेरील छायाचित्रे आणि चित्रफिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
पलक तिवारी लवकरच ‘रोजी- सॅफ्रॉन चॅप्टर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या हॉरर-सस्पेनस चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. विवेक ओबेरॉय आणि प्रेरणा व्ही. अरोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात पलकसोबत अरबाज खान मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तर अलिकडेच पलक तिवारी सिंगर हार्डी संधूसोबत ‘बिजली-बिजली’ गाण्यात दिसून आली होती. तिचे हे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले होते.
इब्राहिम सध्या ‘रॉकी और रानी के प्रेम कहानी’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करण जौहरसोबत काम करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट, शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. इब्रहिमला करण जौहरकडून लवकरच पदार्पणाची संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.