बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर 2017 च्या नीरजा चित्रपटातून अखेरची दिसून आली होती. त्यानंतर 4 वर्षांनी ब्लाइंड चित्रपटद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात कमबॅक करण्यास ती तयार आहे. दिग्दर्शक सुजोय घोष हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याच्या तयारीत होते. पण कोरोनामुळे ते शक्य होईल असे तूर्तास वाटत नाही. अशा स्थितीत निर्मात्यांनी अधिक प्रतीक्षा न करता चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार चालविला आहे. चांगली ऑफर देणाऱया ओटीटी प्लॅटफॉर्मची निवड करण्यात येणार आहे.
निर्मात्यांनी सध्या तीन विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्ससोबत चर्चा चालविली आहे. आहे. चित्रपटात सोनम एका अंध पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. याकरता तिने ब्लाइंड कोचकडून प्रशिक्षण घेतले आहे. सोनमसोबत चित्रपटात विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलित दुबेही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहेत.