गेम वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेम वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. याच दरम्यान गेम खेळणाऱया ग्राहकांसाठी सकारात्मक बाब ही, की सोनीकडून आपल्या प्लॅटफॉर्मवर प्लेस्टेशन 5 (पीएस-5) आता प्री ऑर्डर करता येणार आहे. सोनीने पीएस5 ला प्री ऑर्डरसाठी आपल्या एप्दज्Atएण् या वेबसाईटवर लिस्टेड केले आहे.
पीएस5 सोनी कंपनीचे गेम प्लेइंग हार्डवेअर आहे. याच्या मदतीने प्लेस्टेशन स्टोरवर गेम खेळता येणार आहे. याच्या ऍक्सेसरीजमध्ये डबल सेंस कंट्रोल आणि याचे चार्ज करण्यासाठी सुविधा आहेत.
सेटअप टीव्हीला जोडता येंणार
पीएस-5 चा व्हिडीओ गेम कंसोलचा मोठा आकार असतो जो जवळपास इतर प्रकारातील सर्व टीव्हींना जोडता येणार आहे.