प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधित व संशयितांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे. सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 15 जण दगावले असून दिवसभरात 56 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बेळगाव शहरातील 26 व ग्रामीण भागातील चौघा जणांचा समावेश आहे. दिवसभरात 29 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहापूर, चव्हाट गल्ली, हिंदवाडी, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, रामतीर्थनगर, पोलीस हेडक्वॉर्टर्स, घी गल्ली, कॅम्प, सांबरा, हिंडलगा, टिळकवाडी, उज्ज्वलनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आयसीएमआरमधील आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सांबरा येथील एअरफोर्स ट्रेनिंग सेंटरमधील चार, बिम्समधील एका कर्मचाऱयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. केएलई चॅरिटेबल शताब्दी हॉस्पिटल-येळ्ळूर रोड येथील तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आयसीएमआरमधील तपासण्या बंद झाल्यामुळे सोमवारी केवळ 56 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गेल्या 24 तासांत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका बेळगाव शहर व तालुक्मयातील 6 जणांचा समावेश आहे. हुक्केरी, बैलहोंगल, रामदुर्ग, अथणी, अंकली, बेल्लद बागेवाडी येथील बाधित व संशयितांचा मृत्यू झाला आहे. एका सिव्हिल हॉस्पिटलमधील मृतांचा हा आकडा आहे.
मात्र, राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार सोमवारी बेळगाव जिल्हय़ात 60 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूण मृतांचा आकडा 85 इतका असल्याचा उल्लेख आहे. मात्र, प्रत्यक्षात हा आकडा 500 च्यावर आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आणखी 868 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत 1 हजार 80 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2 हजार 523 जणांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. जिल्हय़ातील 44 हजार 479 जणांच्या आरोग्यावर आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे. तर 8 हजार 975 जण 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहेत.
सिव्हिल हॉस्पिटलवरील ताण कमी; व्यवस्था अद्याप सुधारलेली नाही
लक्षणे असणाऱया बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे साहजिकच चिंता वाढली आहे. खोकला, श्वसनाचा त्रास आदी कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. आता सर्व तालुक्मयात कोविड केअर सेंटर सुरू केल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवरील ताण कमी झाला असला तरी येथील व्यवस्था अद्याप सुधारलेली नाही.