सोरियासिस हा त्वचाविकारांमधला काहीसा किचकट असा प्रकार आहे. अंगावर भुरकट रंगाचे चट्टे येणे, त्यातून कोंबडय़ासारखा पापुद्रा बाहेर येणे असे सर्वसाधारण स्वरूप या आजाराचे असते. याशिवाय प्रचंड प्रमाणात खाजदेखील पाहावयास मिळते. त्यामुळे त्वचेला तडे जाऊन रक्त येण्याचे प्रकारही घडतात.
ज्या ठिकाणी त्वचा दुमडली जाते, अर्थात सांध्यावरील त्वचेचा भाग, कंबर, टाळू ही मुख्यत्वेकरून या आजाराची जागा, अर्थात उग्र स्वरूपात पसरलेला दिसतो.
जखमांमुळे हालचालींवर बंधने येतात. खाजेमुळे झोप विस्कळीत होते. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीचा वापर विस्कळीत होतो. यामुळे व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्य तणावग्रस्त होते. ङ या आजारात त्वचेबरोबर नखात, सांध्यात विकृती येऊ शकते.