तरुण भारत संवाद सोलापूर / प्रतिनिधी
सोलापुरात नव्याने 43 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 17 पुरुष आणि 25 स्त्रियांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 709 वर पोहचली आहे. उर्वरित व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरूवारी दिली.
आज 129 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यातील 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 87 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकाचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकूण 6 हजार 289 जणांचे तपासणी करण्यात आली. यातील 5580 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर 709 अहवाल पॉझिटिव आले आहे. एकूण 67 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 311 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ही आकडेवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ची आहे. उर्वरित माहिती जिल्हाधिकारी शंभरकर संध्याकाळी देणार आहेत.