- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
- एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या झाली 548
सोलापूर / प्रतिनिधी
शहरात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नविन 32 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. ज्यामध्ये 21 पुरुष व 11 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 548 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज सकाळी 8 वाजेपर्यंत 135 जणांचे तपासणी अहवाल आले. यामध्ये 32 जणांचे अहवाल पॉजिटिव तर 103 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सोलापुरातील एकूण मृत व्यक्तींची संख्या आता 40 झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीची संख्या 224 झाली आहे. सोलापुरातील 5329 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 4781 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 548 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ही आकडेवारी शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतची आहे. उर्वरित माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर संध्याकाळी देणार आहेत.