सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 146 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 92 पुरुष, 54 स्त्रियांचा समावेश आहे. आज 9 तर आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 2275 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1565 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण मोहोळ , दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, बार्शी, सांगोला, माळशिरस, माढा तालुक्यातील आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 823 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 677 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 146 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 2421 रुग्णांपैकी 1501पुरुष 920 स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 733 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 422
मंगळवेढा- 57
बार्शी – 574
माढा- 87
माळशिरस – 102
मोहोळ- 174
उत्तर सोलापूर – 203
करमाळा- 58
सांगोला – 31
पंढरपूर 236
दक्षिण सोलापूर – 477
एकूण – 2421
———/–
होम क्वांरटाईन – 3019
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 18423
प्राप्त अहवाल- 18340
प्रलंबित अहवाल- 83
एकूण निगेटिव्ह – 15920
कोरोनाबाधितांची संख्या- 2421
रुग्णालयात दाखल – 1631
आतापर्यंत बरे – 733
मृत – 57