सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी 40 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 23 पुरुष, 17 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 401 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 229 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी बुधवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर 1, नवीन विडी घरकुल तालुका दक्षिण सोलापूर 5, पोलीस होटगी तालुका दक्षिण सोलापूर एक, लिंबी चिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर एक, कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर एक, मूळ पत्ता मुंबई सध्या पंढरपूर शहर दोन, तालुका पोलीस स्टेशनच्या पाठीमागे पंढरपूर 1, गणेश नगर पंढरपूर एक, शेगाव दुमाला तालुका पंढरपूर एक, आष्टी तालुका मोहोळ एक, मेहबूब नगर मोहोळ, एक किस्तके मळा अक्कलकोट दोन, माणिक पेठ अक्कलकोट चार ,बुधवार पेठ अक्कलकोट एक, बानेगाव तालुका उत्तर सोलापूर दोन, मार्डी तालुका उत्तर सोलापूर 15, या क्षेत्रात रुग्णआढळले आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 229 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 189 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 40 पॉझिटिव्ह आढळल्या आहेत . 401 रुग्णांपैकी 249 पुरुष 152 स्त्री आहेत. तालुक्यात आज एक तर आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज 12 तर एकूण 154 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 76
बार्शी – 51
माढा- 8
माळशिरस – 5
मोहोळ- 23
उत्तर सोलापूर – 45
करमाळा- 1
सांगोला – 3
पंढरपूर 21
दक्षिण सोलापूर – 168
एकूण – 401
होम क्वांरटाईन – 1755
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 4050
प्राप्त अहवाल- 4002
प्रलंबित अहवाल- 48
एकूण निगेटिव्ह – 3602
कोरोनाबाधितांची संख्या- 401
रुग्णालयात दाखल – 229
आतापर्यंत बरे – 154
मृत – 18