वार्ताहर / औंध
जायगांव ता खटाव येथील तन्मय मच्छिंद्र देशमुख यांची सातारा जिल्हा सोशल मीडिया सेलच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या फेसबुक पेजवरील तन्मय देशमुख यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्याची सोशल मीडिया सातारा जिल्हा सरचिटणीस पदावर नियुक्ती केली आहे.
पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ,आमदार शशिकांत शिंदे, माजी आ. प्रभाकर घार्गे , राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी सभापती संदीप मांडवे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन कुराडे, प्रा. बंडा गोडसे, युवक उपाध्यक्ष जयदीप शिंदे, प्रतीक विधाते, रमेश देशमुख, किसनबाबा देशमुख यांच्या उपस्थित तन्मयला नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.