रशियाला भारताने दिला झटका : शस्त्रास्त्रव्यापारात अमेरिका अव्वल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आता शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयातदार देश राहिलेला नाही. शस्त्रास्त्रांच्या खरेदीत भारताची जागा आता आखाती देश सौदी अरेबियाने घेतली आहे. आघाडीच्या 5 शस्त्रास्त्र आयातदार देशांच्या यादीत भारत आता दुसऱया स्थानावर आहे. या यादीत तिसऱया क्रमांकावर इजिप्त, चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आणि पाचव्या स्थानी चीन आहे. या 5 देशांचा जगातील एकूण शस्त्रास्त्रांच्या आयातीत 36 टक्के वाटा आहे.
स्टॉकहोम येथील संस्था सिप्रीच्या 2015-19च्या अहवालानुसार जगात सर्वाधिक शस्त्रास्त्रांची निर्यात अमेरिका करत आहे. अमेरिकेनंतर रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि चीनचा क्रम लागतो. सर्वाधिक शस्त्रास्त्रांची खरेदी पश्चिम आशियातील देश करत आहेत. शस्त्रास्त्रांच्या निर्यातीप्रकरणी अमेरिका आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी मोठी आघाडी प्राप्त केली आहे. अमेरिकेची एकूण शस्त्रास्त्र निर्यात 23 टक्क्यांनी वाढली आहे. जगातील एकूण शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत अमेरिकेचा हिस्सा वाढून 36 टक्के झाला आहे. 2015-19 या कालावधीत अमेरिकेची एकूण शस्त्रनिर्यात दुसऱया क्रमांकावरील रशियापेक्षा 76 टक्के अधिक आहे. अमेरिकेने एकूण 96 देशांना शस्त्रास्त्रs पुरविली आहेत.
रशियाची निर्यात घटली
रशियाची एकूण शस्त्रास्त्रांची निर्यात 18 टक्क्यांनी कमी झाली आहे. भारताने शस्त्रास्त्र खरेदीत अन्य पर्यायांना प्राधान्य दिल्याने रशियाच्या निर्यातीत मोठी घसरण झाली आहे. रशियाने इजिप्त आणि इराकला शस्त्रास्त्रs विकली असली तरीही भारताप्रकरणी होणाऱया तोटय़ाची भरपाई होऊ शकलेली नाही. शस्त्रास्त्रांच्या खरेदीत पाकिस्तान 11 व्या स्थानी आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही शस्त्रास्त्रs पुरविणारे अनेक देश असल्याचे अहवालात नमूद आहे.
राफेलमुळे फ्रान्सला लाभ
अमेरिकेच्या एकूण शस्त्रास्त्रविक्रीतील निम्म्याहून अधिक वाटा पश्चिम आशियात पोहोचला आहे. याचदरम्यान भारताने राफेल विमान, कतार आणि इजिप्तने शस्त्रास्त्रखरेदी केल्याने फ्रान्सच्या शस्त्रास्त्रांची निर्यात मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.