मुंबई
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याज दरात 25 बेसिस पॉइंटने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा कर्जदारांना उठवता येणार आहे. बँकेचे कपात केलेले नवे व्याज दर 10 जूनपासून अंमलात येणार आहेत. एक वर्षाचा बँकेचा एमसीएलआर दर घटवून 7 टक्क्यांवर आणला आहे. याआधी तो 7.25 टक्के इतका होता. बँकेने 13 व्यांदा एमसीएलआर दरात कपात केली आहे.