नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने पहिल्या तिमाहीत कोरोना संकटात वार्षिक आधारावर 81 टक्क्मयांची तेजी प्राप्त केली आहे. निव्वळ नफा हा 4189 कोटी रुपये राहिला असून 2019 च्या जून तिमाहीत हा नफा 2312 कोटींवर राहिल्याची माहिती आहे. पहिल्या तिमाहीत स्टेट बँकेने एसबीआय लाईफमध्ये हिस्सेदारी विकली होती. याच्या मदतीने बँकेने 1367 कोटींचा नफा कमावला आहे. लाईफ इन्शुरन्स फर्ममधील एसबीआयची हिस्सेदारी दोन टक्क्मयांनी घटलीय. प्रथम हा 57.60 टक्के होता, जो घटून 55.50 टक्क्मयांवर पोहोचला आहे. जूनच्या तिमाहीत बँकेची निव्वळ व्याजातून 26641 कोटी कमाई झाली आहे.