नवी दिल्ली
हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेटने डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीमध्ये नफ्याची प्रथमच दीर्घकाळानंतर नोंद केली असल्याची माहिती आहे. कंपनी गेल्या सात तिमाहीमध्ये तोटाच सहन करत होती. डिसेंबर 2021 तिमाहीअखेर कंपनीने 42 कोटी रुपयांचा नफा कमावल्याचे दिसून आले आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये 66 कोटी रुपयांचा तोटा कंपनीने सहन केला होता. महसूलही 34 टक्क्याने वाढून 2204 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वर्षी समान तिमाहीमध्ये 1635 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता.