कोरूना
ला लीगा फुटबॉल स्पर्धेत खेळणारा स्पेनचा माजी फुटबॉलपटू 29 वर्षीय टोनी डोव्हाल आता आपल्या देशातील कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी सज्ज झाला आहे. फुटबॉल सोडल्यानंतर त्याने फार्मसीची पदवी घेतली आणि औषधे उत्पादन क्षेत्रात त्याने प्रवेश केला. याचा उपयोग स्पेनच्या जनतेसाठी तो करणार आहे. दरम्यान स्पेनमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झपाटय़ाने सुरू झाल्याने या देशातील सर्व वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले. संपूर्ण देश लॉकआऊट करण्यात आला आहे.
स्पेनला कोरोना व्हायरसचा फटका जबरदस्त बसला असून या देशात आतापर्यंत मृतांचा अधिकृत आकडा 4800 असून सुमारे 10,000 लोकांना कोव्हिड-19 ची बाधा झाली आहे. वैद्यकीय उपचार या रूग्णावर सुरू असून काही जणांच्या प्रप्रृतीमध्ये सुधारणा दिसत असल्याचे सांगण्यात आले. फुटबॉलपटू डोव्हाल याचे निवासस्थान गॅलिसिया येथे असून तो सध्या कोरूना शहरात वास्तव्य करीत आहे. स्पेनच्या जनतेसाठी आता त्याने फार्मसीस्टचा पांढरा ऍप्रन परिधान करत कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रूग्णांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे.