वृत्तसंस्था/ मेलबर्न
येथे सोमवारपासून ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. स्पेनचा द्वितीय मानांकित टेनिसपटू 34 वर्षीय राफेल नदाल याला पाठदुखापतीची समस्या भेडसावत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या एटीपी चषक सांघिक टेनिस स्पर्धेत या दुखापतीमुळे नदालला सहभागी होता आले नव्हते.
नदालने आतापर्यंत 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. नदालचा या स्पर्धेतील पहिला सामना मंगळवारी होत आहे. या सामन्यापूर्वी तो आपली तंदुरूस्ती राखण्यासाठी झगडत आहे. नदालने आपर्यंत म्हणजे 2009 साली केवळ एकदाच ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे तसेच 2012 साली या स्पर्धेत सर्बियाचा जोकोव्हिच आणि नदाल यांच्यात दीर्घ कालावधीचा अंतिम सामना खेळविला गेला होता. नदालचा मंगळवारी या स्पर्धेत पहिल्या फेरीतील सामना सर्बियाच्या डिजेरी बरोबर होणार आहे.