पोलीस अधिकाऱयांची बैठक : विनापरवाना क्वारींवरही होणार कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
शिमोगा व चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ातील वनविभागात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही खबरदारी घेण्यात आली आहे. बुधवारी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या उपस्थितीत वरि÷ अधिकाऱयांची बैठक झाली.
हिरेनागवेली जंगल परिसरात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी खबरदारी घ्यावी. बेकायदा क्वारी व बेकायदा स्फोटकांचा साठा करणाऱयांवर नजर ठेवण्याची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी आपल्या अधिकाऱयांना दिली आहे. केवळ बेकायदा क्वारी व स्फोटकांचा साठा करणाऱयांवर कारवाई करणे हा एकच उद्देश आहे. कायदेशीररित्या सुरू असणाऱया क्वारी बंद करण्याचा हेतू नाही. मानवी जीवाला धोका होवू नये, अशा पद्धतीने स्फोटकांचा वापर कसा करायचा यासंबंधी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे पोलीस प्रमुखांनी सांगितले.
बेकायदा स्फोटकांची वाहतूक थोपविण्यासाठी अधिकाऱयांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. कोणत्याही परवानगीशिवाय सुरू करण्यात आलेल्या क्वारींचे सर्वेक्षण करून आठवडय़ाभरात अहवाल देण्यात यावेत. यापुढे दरमहा तालुका पातळीवर बैठक घेऊन त्याचा अहवाल आपल्याला द्यावा. सर्व शासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून माहिती पुरविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा पोलीस प्रमुखांनी बैठकीत केले आहे.
वाळू वाहतूक करणाऱया प्रत्येक वाहनांना जीपीएस सुविधा बसविण्याची सूचना पोलीस प्रमुखांनी केली असून जे या सूचनेचे पालन करत नाहीत अशा वाहनांना वाळू वाहतूक करण्यासाठी परवानगी देऊ नये. पास नसलेली वाहने ताब्यात घेण्यात यावीत. मार्च अखेरपर्यंत खाण व्यवसाय, स्फोटकांची वाहतूक व साठा याविषयी माहिती जमवून त्याचा अहवाल द्यावा. प्रामुख्याने गोकाक तालुक्मयातील सत्तीगेरी येथे बेकायदा क्वारी सुरू झाल्या आहेत. सर्व विभागाच्या अधिकाऱयांनी तेथे भेट देऊन पाहणी करण्याची सूचनाही पोलीस प्रमुखांनी केली.
येत्या आठवडय़ाभरात स्फोटकांची कायेदशीर वाहतूक हाताळणी संदर्भात कार्यशाळा भरविण्यात येणार आहे. या स्फोटकांचा वापर कशा पद्धतीने करावा, याची माहिती देण्यात येणार आहे. स्फोटकांवर पेट्रोल व रॉकेलचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे दुर्घटना घडू लागल्या आहेत. यासंबंधीही बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत खाण व भूगर्भ, वन खाते, अग्निशमन दल, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम, पंचायत राज विभाग व पोलीस अधिकारी उपस्थित होते.