लाँचिंगनंतर 50 लाखांपेक्षा अधिकवेळा डाऊनलोड
नवी दिल्ली
मुकेश अंबानी यांनी ग्रॉसरी रिटेल प्लॅटफॉर्म जिओ मॉर्ट सादर केल्यानंतर जवळपास सहा आठवडय़ानंतर गुगल प्ले स्टोअरवर तब्बल 50 लाखापेक्षा अधिकवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. सदर ऍप बाजारात 16 जुलै 2020 रोजी प्ले स्टोअरवर दाखल करण्यात आले होते आणि जवळपास पाच दिवसांच्या आतच 10 लाखापेक्षा अधिकवेळा हे ऍप डाऊनलोड करण्यात आले आहे.
जिओ मार्टला 4.7 चे रेटिंग मिळाले आहे. तसेच बिग बास्केट ऍपला 4.2 आणि ग्रोफर्सला 4.1 चे रेटिंग मिळणार आहे. ऍमेझॉन पँट्री आणि फ्लिपकार्ट सुपरमार्ट ऑनलाईन ग्रॉसरी सेगमेंटमध्ये भारतात उपलब्ध आहे.
रिलायन्स 200 पेक्षा अधिक शहरांमध्ये डिलिव्हरी करत आहे. जिओमार्ट वेबसाईट तयार करण्यात आल्याच्या दोन महिन्यानंतर हे ऍप सादर केले होते. ऍप आणि वेबसाईटवर 5 टक्क्मयांची सवलत मिळत आहे. डिसेंबर 2019 मध्ये रिलायन्सने जिओ मार्टचा प्रारंभ मुंबईच्या काही विभागामध्ये केला होता. जिओ मार्टवर सर्वसामान्य ग्राहकांसाठी गरजेनुसार 50 हजारपेक्षा अधिकची उत्पादने उपलब्ध असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
बिगबास्केट आणि ग्रोफर्सला टक्कर
जिओमार्टला टक्कर देण्यासाठी मुख्य स्वरुपात चिनी ई कॉमर्स कंपनी अलीबाबाअंतर्गत चालविली जाणारी बिगबास्केट आणि जपानची स्टार्टअप बँकर सॉफ्टबँक फंडिंग कंपनी ग्रोफर्स यांच्यासोबत राहणार आहे. सदरचे दोन्ही ऍप प्ले स्टोअरवरुन 1 कोटीपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. याचाच अर्थ जिओ मार्टची लोकप्रियता वाढते आहे, हे स्पष्ष्ट आहे.