प्रतिनिधी/ बेळगाव
स्वदेशी जागरण मंचतर्फे रविवार दि. 20 जून रोजी सकाळी 11 वाजता विश्वजागरण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ‘पेटंट फ्री व्हॅक्सीन’साठी जनजागृती करण्यात येणार आहे.
सर्व भारतीयांना पेटंट फ्री लस उपलब्ध व्हावी यासाठी सदर मंचने स्वाक्षरी मोहीम हाती घेतली होती. त्याला बऱयापैकी यश आले असून याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. कोरोनामुळे कोविड-19 चे नियम पाळणे आवश्यक असल्याने प्रत्येक गल्लीमध्ये किंवा विभागामध्ये फक्त 8 ते 10 लोकांनी एकत्र येवून जागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.