बेळगाव : येथील श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्यावतीने सिव्हिल हॉस्पिटल (बिम्स) मधील कोरोना योद्धय़ांचा सत्कार करण्यात आला. बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून बिम्सच्या प्रशासकीय अधिकारी आफ्रीनबानू सय्यद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हुसेन काजी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ, बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. गिरीश दंडगी, स्वामी समर्थ परिवाराचे मौनेश्वर गरग, संदीप चौगुले, माजी महापौर विजय मोरे, बिम्समधील परिचारिका विभागाच्या कांचनमाला, एल. एस. पंगण्णावर आदी उपस्थित होते.
प्रकाश कोडली यांनी स्वागत केले. रमेश संकरट्टी यांनी आभार मानले. सचिन परमशेट्टी यांनी सूत्रसंचालन केले. दीपक कुंभार, निलेश पाटील, ऍलन मोरे, सुरेश काळभैरव, विनय चव्हाण, अजित मनजकर, नामदेव माळगी, गिरीगौडा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात डी ग्रुप कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला.