नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीयांकडून जमा करण्यात येत असलेल्या पैशांचे प्रमाण मागील काही वर्षात मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. मागील वषी भारतीयांनी स्विस बँकेत जमा केलेली रक्कम 2.55 अब्ज स्विस प्रँक म्हणजेच 20,700 कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. मागील 13 वर्षांमध्ये भारतीयांनी जमा केलेली ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे दिसून येत आहे. स्विस बँकांमध्ये भारतीयांकडून पैसे जमा करणाऱयांमध्ये सिक्मयुरिटीज आणि इतर कंपन्यांचाही सहभाग असल्याचे स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
स्विस नॅशनल बँकेने (एसएमबी) दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या शेवटी स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिकांनी सर्वाधिक म्हणजे जवळपास 13,500 कोटी रुपये बॉन्ड्स सिक्मयुरिटीज आणि इतर वित्तीय साधनांच्या माध्यमातून जमा केले होते. तर भारतीय बँकांनी जमा केलेली रक्कम 3,100 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. भारतातील विविध ट्रस्टने जमा केलेली रक्कम 16.5 कोटी रुपये इतकी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. भारतातील इतर ग्राहकांनी मागील वर्षाच्या अखेरीस 4,000 कोटी रुपये जमा केले. 2019 च्या तुलनेत या प्रकारातील ग्राहकांची रक्कम 2020 मध्ये बरीच वाढली आहे. 2019 मध्ये भारतीय ग्राहकांनी जमा केलेली रक्कम 89.9 कोटी स्विस प्रँक म्हणजे 6,625 कोटी रुपये इतकी होती. मात्र 2020 च्या अखेरीस ही रक्कम 13 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचली आहे. स्वित्झर्लंडमधील करव्यवस्था सोपी असल्यामुळे या व्यवस्थेचा गैरफायदा घेत जगातील अनेक देशांमधील श्रीमंत व्यक्ती त्यांची बेहिशेबी संपत्ती स्विस बँकेत ठेवतात. या संपत्तीची माहिती जगापासून लपवून ठेवण्यासाठी स्विस बँक संबंधित खातेदारांकडून विशेष शुल्कदेखील वसूल करत होती. काळय़ा पैशाविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबावगट तयार झाल्यानंतर स्वित्झर्लंडने भारतासह जगातील 86 देशांशी करार केला. या करारानुसार स्विस बँक संबंधित देशांना टप्प्याटप्प्याने खातेदारांची माहिती देत आहे.