साईराज चषक ग्रामीण क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक ग्रामीण भाग मर्यादीत टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनदिवशी जगदंबा हंगरगा, मराठा स्पोर्ट्स मण्णूर, शिवसेना खादरवाडी, न्यू स्टार मच्छे संघानी पुढील फेरीत प्रवेश केला. आनंद पाटील, फैजुल्ला मुल्ला, कल्लाप्पा सावंत, आकाश सामनावीर ठरले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप पवार, बाळू फगरे, पुरस्कर्ते महेश फगरे, आदिनाथ गावडे, यश पवार, आनंद चव्हाण, रमेश गवळी, संभाजी देसाई, गजानन फगरे उपस्थित होते. बाळू फगरे यांनी मैदानाचे पुजन केले. दिलीप पवार यांच्या हस्ते यष्टीचे पुजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेत 38 संघानी भाग घेतला आहे.
पहिल्या सामन्यात जी. बी. स्पोर्ट्स काकतीने 5 बाद 80 धावा केल्या. जगदंबा हंगरगा संघाने 7.3 षटकात 1 बाद 83 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. दुसऱया सामन्यात कलमेश्वर स्पोर्ट्स कल्लेहोळ संघाने 8 षटकात 9 गडीबाद 59 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सने 7.4 षटकात 2 गडी बाद 60 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला.
तिसऱया सामन्यात शिवसेना खादरवाडी संघाने 8 षटकात 6 बाद 101 धावा केल्या. त्यात आनंद पाटीलने 48 धावा केल्या. त्याला उत्तर देताना पिरनवाडी संघाने 8 षटकात 9 बाद 77 धावाच केल्या. बसवराजने 17 तर उमेशने 12 धावा केल्या. खादरवाडीतर्फे राकेशने 4, ऋषिकेशने 2 गडी बाद केले.
चौथ्या सामन्यात न्यू स्टार मच्छेने 8 बाद 95 धावा केल्या. फैजुल्ला मुल्लाने 58 धावा केल्या. सावगावतर्फे बसवराजने 3 गडी बाद केले. बजरंगबली सांवगावने 8 षटकात 5 बाद 73 धावाच केल्या. त्यात मनोहरने 35 तर संतोषने 15 धावा केल्या. मच्छेतर्फे फैजुल्लाने 2 गडी बाद केले.