या व्यक्तीच्या जेवणात अखेर असे काय आहे?
सोशल मीडियावर लोकांना कधी काय पसंत पडते हे सांगता येत नाही. कुणाच्या रात्रीच्या जेवणात काय असू शकते हे पाहण्यासाठी हजारो लोक प्रतीक्षा करत आहेत. इंग्लंडच्या शेफील्डमध्ये राहणाऱया जॅसन जोवॅनोविक याची डिनर प्लेट सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 30 हजार फॉलोअर्स त्याचे जेवण पाहण्याची प्रतीक्षा करत असतात.
जॅसन जोवॅनोविक इन्स्टाग्रामवर अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. लोकांना त्याच्या रात्रीच्या जेवणाचा मेन्यू मजेशीर वाटतो आणि तो पाहण्यासाठी ते प्रतीक्षा करत असतात. 45 वर्षीय जॅसनला इन्स्टाग्रामवर एक अकौंट स्वतःच्या कामासाठी तयार करून देण्यात आले होते. परंतु यावर काय पोस्ट करावे हेच त्याला सुचत नव्हते. अखेर त्याने स्वतःच्या रात्रीच्या खाण्याची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर करण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्याची ही छायाचित्रे व्हायरल झाली.
साउथ यॉर्कशायरमध्ये राहणारा जॅसन अविवाहित आहे. एकटा असल्याने तो स्वतःसाठी स्वयंपाक करतो. त्याला जे काही करायला जमते, त्यानुसार तो खाद्यपदार्थ तयार करतो. लोकांना त्याची मिश मॅशन खाण्याची स्टाइल पसंत पडली असून तो आता इंटरनेट सेंसेशन ठरला आहे.
मी कधीच एक चांगला कुक (स्वयंपाकी/आचारी) नव्हतो. किचनमध्ये अधिक गोष्टी मला समजत नाहीत. याचमुळे माझे खाणे काही वेगळेच कॉम्बिनेशनमध्ये पोहोचते असे त्याने म्हटले आहे. आता त्याच्या अजब डिश प्लेटला अमेरिकेपासून चीन आणि जपानमधील लोक देखील पाहत आहेत.
जॅसननुसार कामावरून घरी पोहोचल्यावर ज्या गोष्टी उपलब्ध असतात, त्यांचा वापर करत डिनर तयार करत असतो. अनेकदा तर आपण काय कॉम्बिनेशन तयार करतोय हेच मला समजत नसल्याचे जॅसनने म्हटले आहे. बॉन्कर्स कॉम्पिटिशनमध्ये कस्टमर असिस्टेंट म्हणून काम करणाऱया जॅसनला लोकांकडून ढिगभर मेसेज मिळू लागले आहेत.
इन्स्टाग्रामवर त्याची लोकप्रियता पाहून आता विविध रेस्टॉरंट आणि फूड चेनकडून त्याला गिफ्ट हॅम्पर्स आणि फूड चॅलेंज मिळते. स्वतः जॅसन स्वतःसाठी अत्यंत अपारंपारिक गोष्टी एकाचवेळी प्लेटमध्ये सर्व्ह करतो.