प्रतिनिधी /बेळगाव
राज्यासह जिल्हय़ात हडपद समाजबांधव अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे हडपद समाजाला निगम मंडळाचे अध्यक्षपद द्यावे, तसेच समाजाच्या निगम मंडळासाठी 50 कोटीचे अनुदान मिळावे, या मागणीकरिता अखिल कर्नाटक हडपद समाज संघाने सोमवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडले. हडपद समाजासाठी देवराज अर्स योजना लागू करावी, याबरोबरच समाजाच्या व्यवसायासाठी लहान-लहान गाळे उपलब्ध करून द्यावेत, वर्ग 3-ए मध्ये असलेल्या नाभिक समाजाचा समावेश 2-ए मध्ये करावा आणि तहसीलदारांनी यासंबंधी प्रमाणपत्र द्यावे, तसेच समाजासाठी निगमची सुरुवात करून शासनाने 50 कोटी अनुदान मंजूर करावे, आदी मागण्यांसाठी अखिल कर्नाटक हडपद समाज संघातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.