ऑनलाईन टीम / चंदीगड :
कझाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत हरियाणातील अंशु आणि सोनम मलिक यांनी प्रवेश केला आहे. अंशु मलिक 57 किलोमध्ये आणि सोनम मलिक 62 किलो वजनी गटात खेळते. सोनम ही सोनपतची तर अंशु मलिक जिंदची रहिवासी आहे. सोनम मलिकच्या ऑलिम्पिक तिकिटाने कुस्तीपटू साक्षी मलिकला जोरदार धक्का बसला आहे.
क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी या दोन्ही महिला कुस्तीपटूंचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.