ऑनलाईन टीम / हरियाणा :
हरियाणामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. मागील चोवीस तासात कोरोनाच्या 381 नव्या रुग्णांची नोंद झाली. काल 585 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्याामुळे कोरोना बाधितांची संख्या 14 हजार 210 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 9502 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये गुरुग्राममध्ये सर्वाधिक 5260, फरिदाबाद मध्ये 3590, सोनपतमध्ये 1208, रोहतक 545, अंबाला 319, पलवल 311, भिवानी 415, करनाल 291, हिसार 228, महेंद्रगड 259, झज्जर 253, रेवाडी 293, नूंह 191, पानिपत 189, कुरुक्षेत्र मधील 117, फतेहाबाद 115, पंचकुला 111, जींद 103, सिरसामधील 105, यमुनानगर मधील 100, कैथल 94 आणि चरखी दादरीमधील 78 रुग्णांचा समावेश आहे.
तर कालच्या दिवसात 9 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 232 वर पोहोचला आहे. तर 75 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.87 टक्के तर संसर्गाचे प्रमाण 5.56 टक्के इतके आहे.