वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोलकाता नाईट रायडर्स संघातील वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने आयपीएलच्या शिस्तपालन नियमाचे उल्लंघन केल्याने स्पर्धा आयोजकांनी त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घातली असून त्याचप्रमाणे त्याला मिळणारे एका सामन्याचे सर्व मानधन दंड म्हणून ठोठावण्यात आले आहे.
कोलकाता आणि दिल्ली यांच्यात सोमवारी ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात हर्षित राणाकडून मैदानावर बेशिस्त वर्तन घडल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्या या प्रकरणाची तपासणी करण्यात आली. स्पर्धा आयोजकांनी या घटनेची तातडीने दखल घेत हर्षित राणावर कारवाई केली आहे.