मतमोजणीस विलंब झाल्याने मोठय़ा प्रमाणात गैरसोय
वार्ताहर/ हलगा
हलगा व तारिहाळ ग्राम पंचायत निवडणुकीत नवख्या उमेदवारांना मतदारांनी आपला कौल दिला आहे. हलगा ग्राम पंचायतमध्ये मागील कार्यकाळातला एक उमेदवार विजयी झाला आहे. तर उर्वरित सर्व नवीन आहेत. हलगा व तारिहाळ ग्रा. पं. ची मतमोजणी दुसऱया सत्रात होती. यामुळे निकाल येण्यासाठी सायंकाळपर्यंत उमेदवारांना थांबावे लागले. निकाल आल्यावर समर्थकांनी एकच जल्लोष केला.
हलगा ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये एकूण 6 प्रभाग असून 18 सदस्य संख्या आहे. यामध्ये प्रभाग 5 मध्ये सुजाता बाबू देसाई, चेतन अशोक कुरंगी यांची यापूर्वीच अविरोध निवड झाली आहे. उर्वरित 16 सदस्यांमध्ये ही निवडणूक झाली. प्रभाग क्र. 1 मध्ये सदानंद बसवंत बिळगोजी, लक्ष्मी आनंद संताजी, पिराजी नागेंद्र जाधव, प्रभाग क्र. 2 मध्ये सागर बाबू कामाण्णाचे, कल्पना किरण हणमंताचे, सरोजा यशवंत वडगावी. प्रभाग 3 मध्ये भुजंग नारायण सालगुडे, नजीर जंगुसाब मुल्ला, लक्ष्मी राजू गजपती, प्रभाग क्र. 4 मध्ये गणपत अर्जुन मारिहाळकर, रेखा धरनेंद्र चिक्कपरप्पा, विलास अशोक परीट, प्रभाग 5 मध्ये रुपा राजू बडिगेर, प्रभाग 6 मध्ये तवनाप्पा पायक्का, भारती अशोक पायक्का, रेखा संजय परीट विजयी झाले आहेत. यामध्ये प्रभाग क्र. 2 मध्ये सरोजा वडगावी यांनी माजी ग्रा. पं. अध्यक्षा निलव्वा कुरंगी यांच्यावर 1 मताने विजय मिळविला आहे. याच प्रभागामध्ये सागर कामाण्णाचे यांनी 250 मतांच्या फरकाने आपला विजय नोंदविला आहे.
तारिहाळ ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये तारिहाळ, चंदनहोसूर, कुळीकोप्प या गावांचा समावेश असून एकूण 17 सदस्य संख्या आहे. यामध्ये कुळीकोप्प येथील प्रभाग क्र. 5 मध्ये बसवराज फकिरा नाईक् अविरोध निवडून आले आहेत. तारिहाळमध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये सविता काशिनाथ कोलकार, गंगव्वा नागव्वा पुजार, प्रमोद सूर्याजी जाधव, प्रभाग क्र. 2 मध्ये गीता बसप्पा तळवार, नागप्पा धर्माप्पा तळवार, प्रभाग क्र. 3 मध्ये सावक्का सिद्राय नाईक, संगीता इराप्पा भोगन्नावर, यल्लाप्पा संताप्पा गौंडाडकर. प्रभाग क्र. 4 मध्ये गीता लक्ष्मण मुचंडी, नामदेव बाळू जोगण्णावर विजयी झाले आहेत. चंदनहोसूर प्रभाग क्र. 6 मध्ये रुदाप्पा मल्लाप्पा तारिहाळ, शांतव्वा आनंद करबन्नावर, कस्तुरी रायप्पा तवगद, बसवंत बाळाप्पा कुंदरगी, प्रभाग क्र. 7 मध्ये पुष्पा नागेंद्र बडिगेर, नागराज आनंद पाटील हे विजयी झाले आहेत.
विजयी उमेदवार गावामध्ये आल्यावर गुलालाची उधळण करून आपापल्या प्रभागामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली आहे.