अनेकांकडून पैसे वसूल करून माजविली दहशत : आळा घालण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना काळात सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असताना बागेवाडी पोलीस स्थानकाचे पीएसआय यांनी हलगा परिसरात अक्षरशः हप्तावसुली सुरू केली आहे. पोलीस व आरोग्य विभागाची एक साधी चिठ्ठी देऊन अनेकांकडून 2 हजारांपासून 5 हजारांपर्यंत वसुली सुरू केली असून दररोज त्याची वसुली 80 ते 90 हजार होत असल्याची चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे या चिठ्ठीवर रकमेचा उल्लेखच घालण्यात येत नाही. त्यामुळे ही रक्कम नेमकी कोणाच्या खिशात जात आहे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्याच्या या दहशतीला वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी आळा घालावा, अशी मागणी हलगा परिसरातील नागरिकांतून होत आहे.
सदर पोलीस अधिकाऱयाचा शेवटचा काळ आहे. आता निवृत्त होणार असून शेवटची वसुली करून जायचा बेत आखल्याचे बोलले जात आहे. बागेवाडी पोलीस स्थानकाचे हे पीएसआय गेल्या काही दिवसांपासून ये-जा करणाऱया वाहनचालकांना अडवून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे घाबरलेले सर्वसामान्य नागरिक तेथेच प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करताना चक्क मोठी रक्कम मोजत आहेत.
याबाबत बागेवाडी पोलीस स्थानकाशी काहींनी संपर्क साधून सदर पीएसआयबद्दल तक्रारही केली आहे. मात्र, वरि÷ अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ वाहनचालकच नाही तर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱया कामगारांना दमदाटी करून त्यांच्याकडूनही रक्कम वसूल करण्यात येत आहे. किराणा दुकानदार महिलेलाही दमदाटी करून तिच्याकडे 20 हजारांची मागणी केली होती. मात्र त्या महिलेने माझ्याकडे इतकी रक्कम नाही. माझी काही चूकही नाहीतर मी रक्कम का देऊ? असे सुनावले. त्यामुळे अखेर हा पीएसआय 2 हजारांवर आला आणि 2 हजार रक्कम घेऊन तो परतला.
गेल्या काही दिवसांपासून हलगा परिसरात त्याने ही दहशत सुरू केली आहे. तेव्हा बागेवाडी पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांनी तसेच पोलीस उपायुक्तांनीही याकडे गांभीर्याने दखल घेऊन संबंधित पीएसआयवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.