वार्ताहर / किणये
हलगा गावात तब्बल 10 फूट धामण साप सोमवारी पकडण्यात आला आहे. शिवाजी गल्लीतील रमेश नागाप्पा केसरकर यांच्या परसात हा साप निदर्शनास आल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. महिलांनी साप पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. सर्पमित्र रामा पाटील यांना बोलावून घेण्यात आले. त्यांनी हा साप पकडल्यानंतर साऱयांचा जीव भांडय़ात पडला.
रमेश केसरकर यांच्या परसातील पट्टय़ामधून लांबलचक साप एका महिलेच्या निदर्शनास आला. त्यांनी इतर आजुबाजूच्या महिलांना सांगितले. यानंतर केसरकर यांच्यात परसात बराच गोंधळ निर्माण झाला. आरडाओरडा झाला. काही जणांनी बस्तवाड येथील सर्पमित्र रामा यांना फोनद्वारे याबाबतची माहिती दिली. काही वेळातच रामा त्याठिकाणी दाखल झाले व त्यांनी अत्यंत चतुराईने त्या सापाला पकडले.
सध्या उष्णतेमध्ये वाढ झाली असून साप बिळातून बाहेर फिरू लागले आहेत. या उन्हाळय़ाच्या दिवसात शेतशिवारात जाणाऱया शेतकऱयांनी तसेच परसामध्ये ठेवण्यात आलेल्या लाकडे, दगडांमध्ये असे साप निदर्शनास येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेने राहणे गरजेचे आहे, असे सर्पमित्र रामा पाटील यांनी सांगितले. हलगा गावात पकडलेला धामण जातीचा साप त्यांनी कुसमळी जवळील डोंगर भागात सोडून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.