नवी दिल्ली
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2021 या काळात हवाई क्षेत्रातल्या नोकऱया 10 टक्के इतक्या घटल्याची माहिती हवाई उड्डाण राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी दिली आहे. विमानसेवा कंपनी, विमानतळ व एअर कार्गो विभागात मिळून वरील काळात 19 हजार 200 जणांनी नोकऱया गमावल्या आहेत. राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. एअर कार्गो विभागात 31 डिसेंबर 2021 अखेर 10 हजार 500 इतके कर्मचारी झाले आहेत. आधीच्या तुलनेत पाहता भरतीत वाढ झाली आहे.