प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे कार उलटून झालेल्या अपघातात वृद्ध ठार झाल़ा ही घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडल़ी भगवान बाबाजी वाडकर (85, ऱा विक्रोळी मुंबई) असे मृताचे नाव आह़े या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भगवान वाडकर हे आपल्या कुटुंबासह कार (एमएच 02 एफसी 2539) ने सावंतवाडी ते मुंबई असे जात होत़े भगवान वाडकर यांचा मुलगा सुनील हा कार चालवित होत़ा हातखंबा येथे कारचे ब्रेक निकामी झाल्याने सुनील याचा गाडीवर ताबा सुटल़ा यावेळी कार रस्त्याकडेला उलटून भगवान हे या अपघातात गंभीर जखमी झाले होत़े त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी मृत घोषित केल़े
या घटनेची माहिती मिळताचा ग्रामीण पोलिसांचे पथकाने घटनास्थळी धाव घेतल़ी तसेच पोलिसांकडून पंचनामा करण्यात आल़ा दरम्यान घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आह़े