प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा गुरूवारी (दि.11) दाखल झाला. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये चार डझनाच्या पेटीला 30 हजार रुपयांचा दर निघाला. एका आंब्याला सुमारे 625 रूपये इतका भाव मिळाला. पहिला सौदा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी संचालक सूर्यकांत पाटील, डी. जी. भास्कर, बी. एच. पाटील यांच्यासह बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील, अडते, खरेदीदार, शेतकरी व बाजार समितीशी संबधित उपस्थित होते.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडÎापासून कोल्हापुरात आंब्याची आवक सुरू होते. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. यंदा परतीचा लांबलेला पाऊस, त्यानंतर अवकाळीने झोडपल्याने आंब्याचा हंगाम लांबणीवर पडतो की काय? असे वाटत होते. मात्र, फेब्रुवारीच्या दुस्रया आठवडÎात हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. आवक कमी असली तरी वेळेत हंगाम सुरू झाला आहे त्यामुळे बागाईतदारांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बुधवारी इब्राहिमभाई बागवान यांच्या अडत दुकानात भाई आयरेकर (देवगड) यांचे 15 हापूस बॉक्स तर इकबाल बागवान यांच्या दुकानात सचिन गोवेकर (कुंभारमठ, मालवण) यांची एक हापूस पेटी व वासुदेव चव्हाण (देवगड) यांच्या एक हापूस पेटीची आवक झाली. सौद्यात एका हापूस आंब्याला तब्बल 625 रुपये दर, चार डझनच्या पेटीला 25 हजार, तर 6 डझनच्या पेटीला 30 हजार भाव मिळाला.
दरम्यान बाजार समितीत इब्राहिम आबाभाई बागवान या व्यापायाच्या 6 नं गाळा येथे झालेल्या सौद्यात देवगडचा शेतकरी योगेश लक्ष्मण आचरेकर यांच्या हापूस आंब्याला मोठा भाव मिळाला. जयवंत कृष्णात वळंजु यांनी एक डझन हापूस 7000 रुपये, तर हाशिम गूलाबसाब बागवान यांनी 15 नग हापूस आंबा 5000 रुपये दराने विकत घेतला. यावेळी बोलताना नविद मुश्रीफ यांनी आंब्याचा भाव स्थिर राहून शेतकऱयाला चार पैसे जादा कसे मिळतील याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.