16 ते 20 मार्च दरम्यान यात्रा भरविण्याचा निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सव दि. 16 मार्च ते 20 मार्च या दरम्यान 5 दिवस भरविण्याचा निर्णय श्री महालक्ष्मी यात्रोत्सव कमिटीने घेतला आहे. सदर यात्रा गाव मर्यादित करण्याची सूचना देखील कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. कोरोनामुळे लांबणीवर पडलेली यात्रा अखेर भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री महालक्ष्मी यात्रोत्सव कमिटीची बैठक लक्ष्मी मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाली. यावेळी ग्रामस्थांची मते जाणून घेऊन यात्रा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंडलगा ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रा मागील वषी करण्याचा निर्णय घेऊन रितीरिवाजाप्रमाणे विविध धार्मिक विधी करण्यात आल्या होत्या. पण कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सर्व यात्रा भरविण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली होती. तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून मागील वषी यात्रा रद्द करण्यात आली होती.
मात्र यात्रा भरविणे आवश्यक असल्याने याबाबत ग्रामस्थांच्या बैठका आयोजित करून चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांची आर्थिक ओढाताण होऊ नये, या उद्देशाने सदर यात्रा गाव मर्यादित व गोड जेवणाची करण्याचा निर्णय यात्रोत्सव कमिटीने जाहीर केला आहे. तसेच यात्रेनिमित्त पै-पाहुण्यांना किंवा कोणालाही अहेराची देवाण-घेवाण करू नये, आपल्याला झेपेल त्या पद्धतीने यात्रा श्रद्धापूर्वक साजरी करावी, असे आवाहन श्री महालक्ष्मी यात्रोत्सव कमिटीने केले आहे.
ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता यात्रा गाव मर्यादित साजरी करावी. अधिक माहितीसाठी कोणत्याही अडचणींसंदर्भात यात्रोत्सव कमिटीशी संपर्क साधावा, असे आवाहन कमिटीचे अध्यक्ष कृष्णा फकिरा पावशे यांनी केले आहे. तसेच यात्रेसंदर्भात पुढील रुपरेषा थोडय़ाच दिवसात जाहीर करण्यात येईल, असे कळविले आह