ओटी भरण्यासाठी गर्दी : आज होणार यात्रेची सांगता
वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा येथील श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त चौथ्या दिवशी शुक्रवार दि. 19 रोजी देवीची ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. शनिवार दि. 20 रोजी यात्रेची सांगता होणार असल्याने संपूर्ण दिवसभर हिंडलग्याला भाविकांचा महापूर लोटला आहे
मंगळवार दि. 16 पासून उत्साही वातावरणात यात्रेला सुरुवात झाली असून, यात्रोत्सव संघाच्या नीटनेटक्या नियोजनामुळे दर्शनासाठी येणाऱया भाविकांनी उत्तमप्रकारे सोय झाली आहे. लोकसंख्येने मोठे गाव असल्याने बेळगावसह परराज्यातूनही भाविक यात्रेला येत आहेत. पण अवघे पाच दिवस यात्रा शुक्रवारी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याने याचा प्रत्यय भाविकांना आला. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. शनिवार दि. 20 रोजी पाचव्या दिवशी यात्रेची सांगता होणार असून, सायंकाळी 5 वा. श्री महालक्ष्मी देवीची वाजत-गाजत मिरवणूकीने सीमेकडे प्रयाण होणार आहे. त्यानंतर यात्रेची सांगता होईल.
मृणाल हेब्बाळकरांकडून भाविकांची सेवा
हिंडलगा श्री महालक्ष्मी यात्रेच्या चौथ्या दिवशी शुक्रवार दि. 19 रोजी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपूत्र व युवा काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर यांनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन सकाळपासून दुपारपर्यंत एका सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांना प्रसादाचे वाटप करून भक्तीभावाने सेवा केली. तसेच भाविकांच्या सोयीसाठी लक्ष्मीताई फौंडेशनतर्फे टँकरद्वारे दैनंदिन सुरळीतपणे पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगूण यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.