वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायतीच्यावतीने रविवारी समर्थ कॉलनी व दत्त कॉलनी परिसरात रस्ता व गटार बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर होते.
गेल्या काही वर्षांपासून परिसरातील रस्ते व गटारीच्या विकासाकडे पंचायतीचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार रविवारी प्रत्यक्ष रस्ता व गटार बांधकामाचा अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. याची दखल घेत मन्नोळकर यांनी सर्व कामे लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन दिले. यावेळी भरमा धामणेकर, बाळेशी हुलमनी, विलास देसाई, श्री. पाटील, प्रसाद कडोलकर, तुकाराम कांबळे, चंद्रकांत मयेकर, संदीप देसाई, डॉ. अनगडकर, राजाराम फडके, सुभाष सावंत, राजाराम पवार, सरिता हुलमनी, शीतल धामणेकर, संगीता बिर्जे, वैशाली पाटील, नितीन बडमंजी, लीला चव्हाण, फ्रान्सिस गोन्साल्विस, प्रमोद तरळे, चाळोबा पाटील, लक्ष्मी पाटील, मारुती कलागते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.