सरकारने उचलले पाऊल : 18 दहशतवाद्यांची यादीत नावे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने 18 दहशतवाद्यांची नावे घोषित दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केली आहेत. हे सर्व जण पाकिस्तानातील असून तेथूनच दहशतवादी संघटनांशी जोडले गेलेले आहेत. अनलॉफुल ऍक्टिविटीज प्रिव्हेंशन ऍक्ट (युएपीए) 1967 अंतर्गत गृह मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. या 18 दहशतवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिदीन प्रमुख सैयद सलाहुदीन समवेत मुंबईवरील हल्ले, संसदेवरील हल्ला आणि कंधार विमान अपहरणात सामील दहशतवाद्यांची नावे आहेत.
साजिद मीर : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अन् मुंबई हल्ल्याचा कट रचणारा.
युसूफ मुजाम्मिल : लष्करेचा कमांडर अन् मुंबई हल्ल्याचा आरोपी
अब्दुल रहमान मक्की : एलईटी प्रमुख हाफिज सईदचा नातेवाईक
शाहिद महमूद : एलईटीची संघटना एफआयएफचा उपप्रमुख
फरहतुल्लाह गौरी : अक्षरधाम तसेच हैदराबाद येथील हल्ल्यात सामील
अब्दुल रौफ असगर : संसदेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार
इब्राहिम अतहर : विमान अपहरणात सामील, संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार
यूसुफ अजहर : कंधार विमान अपहरणात सामील
शाहिद लतीफ : भारतात जैशचे जाळे निर्माण करणारा, हल्ल्यात सामील
सैयद सलाहुदीन : हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या, दहशतवादाची निधीसंकलन
गुलाम नबी खान : हिजबुल मुजाहिदीनचा उपप्रमुख
जफर हुसैन भट : हिजबुलचा उपप्रमुख, वित्तपुरवठय़ाचे काम पाहतो
रियाज इस्माइल शाहबांदरी : इंडिय मुजाहिदीनचा संस्थापक, हल्ल्यांमध्ये सामील
मोहम्मद इक्बाल : जयपूर, दिल्ली, अहमदाबाद, सूरत येथील स्फोटामागे हात
शेख शकील : दाऊदच्या अंडरवर्ल्डशी संबंधित, शस्त्रास्त्रतस्करीत सामील
मोहम्मद अनीस खान : 1993 च्या मुंबई साखळी स्फोटांमध्ये सामील
टायगर मेनन : मुंबई साखळी स्फोटांचा कट रचणाऱयांपैकी एक
जावेद चिकना : मुंबईतील साखळी स्फोटाच्या कटात सामील