ऑनलाईन टीम / शिमला :
मंत्रिमंडळाने हिमाचल प्रदेशातील विभिन्न भागात 283 सफरचंद खरेदी केंद्र आणि जवळपास 1.50 लाख मेट्रिक टन सफरचंद खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सफरचंदांची खरेदी 20 जुलै ते 15 नोव्हेंबर दरम्यान केली जाणार आहे. सरकारने सफरचंदाचा सीझन सुरू होण्यापूर्वी सी ग्रेड सफरचंदाची किंमत 50 पैसे वाढवली आहे. त्यामुळे बागायतदारांना आता सफरचंदाचा हमीभाव 8.50 रुपये किलोने मिळणार आहे.
मात्र लिंबू प्रजातीच्या फळांमध्ये सरकारने वाढ केली नाही. तर आंब्याचा हमीभाव 8.50 रुपये ठेवले आहे. मागच्यावेळी आंब्याचा हमीभाव 7.50 रुपये होता. आंबे आणि अन्य फळांची खरेदी 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत केली जाणार आहे.