हैदराबाद / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्या कारला सोमवारी अपघात झाला. राज्यपाल दत्तात्रेय हे हैदराबादहून नलगोंडा जिह्यातील एका कार्यक्रमासाठी जात असताना हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर राज्यपाल दत्तात्रेय घटनास्थळावरून अन्य वाहनाद्वारे पुढे रवाना झाले. कारचालकाने वेळीच प्रसंगावधान राखत कारचा वेग कमी केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांची कार रस्त्याच्या कडेला उतरून एका झाडीत शिरली. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारचे स्टेअरिंग जाम झाल्याने हा अपघात घडल्याचेही स्पष्ट करण्यात आले.