एक किलोमध्ये खरेदी करता येणार घर
जगातील सर्वात मूल्यवान वस्तूंमध्ये बहुतांश लोक सोने, चांदी आणि हिऱयांचा उल्लेख करतील. पण एखाद्या धातू किंवा रत्नापेक्षा जगात एका लाकडाची किंमत अधिक आहे. एक्वीलेरिया या झाडापासून प्राप्त होणाऱया एगरवूड लाकडाला एलोववुड किंवा ईगलवुड देखील म्हटले जाते. हे लाकूड अरब देश, जपान, चीन, भारत आणि दक्षिणपूर्व आशियाई देशांमध्ये आढळून येते.
एगरवूड जगातील सर्वात दुर्लक्ष आणि महाग विकले जाणारे लाकूड आहे. एका किलोग्रॅम एगरवूड लाकडाची किंमत 1 लाख डॉलर्स किंवा 73 लाख रुपयांपर्यंत असू शकते. सध्या भारतात एक ग्रॅम हिऱयाची किंमत 3 लाख 25 हजार रुपये आहे. तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजारांच्या आसपास आहे. एगरवूडला सर्वसाधारणपणे जपानमध्ये क्यारा किंवा क्यानम या नावानेही ओळखले जाते.
25 लाख रुपयांमध्ये तेलाची विक्री
एगरवूड लाकडापासून अत्तर किंवा अन्य सुगंधी वस्तू तयार केल्या जातात. लाकूड सडल्यावर याचा वापर अत्तर तयार करण्यासाठी केला जातो. एगरवूडपासून क्वाउड ऑईल देखील निर्माण होते. याच तेलापासून परफ्यूम तयार केले जात असतात. सद्यकाळात याची तेलाच किंमत 25 लाख रुपये प्रति लिटर आहे. किमतीमुळे या लाकडाला ‘देवतांचे लाकूड’ देखील म्हटले जाते.
मोठय़ा प्रमाणावर तस्करी
चीन, जपान आणि हाँगकांगमध्ये याचे अनेक वृक्ष आहेत. हे लाकूड अत्यंत मूल्यवान असल्याने मोठय़ा प्रमाणावर याची तस्करी आणि अवैध कत्तल केली जाते. तस्करीचे प्रमाण प्रचंड वाढल्याने आता एक्वीलेरियाचे वृक्ष जवळपास संपुष्टात आले आहेत. एशियन प्लँटेशन कॅपिटल कंपनी ही आशियातील सर्वात मोठी एगरवूड प्रोसेसिंग कंपनी आहे.