केएससीए ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने प्रतिस्पर्ध्याचा 222 धावानी पराभव करून आपली विजयी घोडदौड कायम राखली. 84 धावा व 15 धावात 6 गडी बाद करणाऱया अष्टपैलू विरेंद सांबरानीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने 50 षटकात 9 बाद 280 धावा केल्या. विरोंद्र सांबरानीने 2 षटकार, 7 चौकारासह 84, धुव नाईकने 1 षटकार, 7 चौकारासह 75, रोहन यारिसीम्मीने 33, साईप्रज्वल रेड्डीने 31, डॉमनीक फर्नांडिसने 14 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे पुरूषोत्तम जकांबलने 32 धावात 2, दीपक राक्षेने 48 धावात 2, चेतन चौगुला, वैष्णव संघमित्र, शिवानंद पाटील, अमेय भातकांडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाचा डाव 14.1 षटकात 48 धावात गारद झाला. त्यात विरेंद्र सांबरानीने 15 धावात 6 गडी बाद केले. डॉमनिक फर्नांडिसने 21 धावात 2, आदर्श प्रकाश, रोहन यारिसिम्मी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.