वृत्तसंस्था/ दुबई
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत रूमानियाची माजी टॉप सीडेड सिमोना हॅलेप, सहावी मानांकित इगा स्वायटेक आणि बार्बोरा क्रेसीकोव्हा यांनी एकेरी विजयी सलामी दिली.
सोमवारी झालेल्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात हॅलेपने 70 मिनिटांच्या कालावधीत ऍलीसन रिसेकीचा 6-2, 6-4, स्वायटेकने कॅसेटकिनाचा 6-1, 6-2 तर क्रेसीकोव्हाने कॅरोलिना गार्सीयाचा 6-4, 7-6 (7-0) असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. स्पेनच्या मुगुरूझाने गेल्या खेपेला या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.