वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉलमार्कविना सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीकरीता सराफी व्यावसायिकांना 1 जून 2021 पर्यंत कालावधी वाढवून मिळाला आहे. या क्षेत्रातील व्यापाऱयांना याचा लाभ होणार आहे.
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हॉलमार्कशिवाय दागिने विक्री करण्यासाठी सरकारने आणखी काही कालावधी वाढवून दिला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2020 पर्यंतच विक्री करण्याची मुभा देण्यात आली होती, असे कळते. कोरोनामुळे सराफी व्यावसायिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळेच हॉलमार्किंगच्या सक्तीचा कालावधी वाढवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. यापुढे 1 जून 2021 पासून सराफी व्यावसायिकांना हॉलमार्कसह दागिने विकणे बंधनकारक असणार आहे.