नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कुटर इंडियाने ऑगस्ट 2020 मध्ये वाहन विक्रीत घट नोंदवली आहे. कंपनीची विक्री ऑगस्टमध्ये 2 टक्के घटून 4 लाख 43 हजार 969 इतकी झाली आहे. मागच्या वर्षी कंपनीने याच महिन्यात 4 लाख 52 हजार 551 दुचाकींची विक्री केली असल्याचे सांगण्यात येते. कंपनीच्या दुचाकींच्या स्थानिक विक्रीत मात्र सुधारणा दिसली असून ती 1 टक्के वाढली आहे. स्थानिक विक्री 4 लाख 28 हजार 231 इतकी होती. याच महिन्यात कंपनीने 15 हजार 738 वाहनांची निर्यात केली आहे, जी मागच्या वर्षी याच महिन्यात 26 हजार 887 इतकी होती. ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत बऱयापैकी कामगिरी कंपनीने नोंदवली असून येणाऱया काळात यात आणखी सुधारणा दिसतील.