प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी किरण जाधव व विमल फौंडेशनच्यावतीने कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होमिओपॅथी इम्युनिटी बुस्टर औषधाचे वितरण करण्यात आले.
सोमवार दि. 31 मेपासून कार्यकर्ते आपापल्या बुथमधून हे औषध घरोघरी वितरित करणार आहेत. सदर कार्याचा शुभारंभ बेळगावचे भाजप नेते व कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी किरण जाधव, राजन जाधव, गजेश नंदगडकर, आरती पटोळे व शिवू बालाजी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.