प्रतिनिधी अक्कलकोट
अक्कलकोट शहरातील मंगरूळे चौक येथे शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजता दोन हायवा टिप्पर १२ ब्रास वाळुसह पकडुन ३० लाख ७२ हजाराचा मुद्देमाल जप्तकेला.
धोंडीबा राम माने (वय २८ वर्ष)रा.शावळ, श्रीशैल बमग्णा माने रा.शावळ, लक्ष्मण भिमाशंकर बनसोडे (वय २७ वर्ष) रा.कडबगांव व जेटप्पा मलप्या मुतगी रा.अक्कलकोट यांच्या वर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उत्तर पोलीस स्टेशनमध्ये अवैध वाळु वाहतुकीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेलीशा अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास येथील मंगरूळे चौकात एक टाटा कंपनीची हायवा टिपर त्यात ०६ बास वाळू ज्याचा आर.टी.ओ.क्रमांक दिसुन येत नाही व दुसरा एक टाटा कंपनीची हायवा टिपर जिचा आरटीओ नंबर के ए ३२ सी ५२०९ ६ बास वाळु भरून आरोपी यांनी संगनमत करन पर्यावरणाचा -हास होईल हे माहीत असताना देखील स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता कोणत्याही प्रकारची शासनाची राँयल्टी न भरता वाळू वाहनांमध्ये भरुन चोरुन घेउन जात असताना मिळून आले. फिर्याद पोकों प्रमोद शिंपाळे यांनी दिली. पोहेकॉ/चिंचोळकर हे अधिक तपास करत आहेत.